Thursday, January 31, 2019

कोकण म्हणजे स्वर्ग

खरच कोकण म्हणजे स्वर्ग म्हणतात ते काही खोट नाही कारण आमची कोकण ट्रिप होती मग आम्ही गाडी बाहेर काडली आणि कोंकणच्या दिशेने रवाना केली.
                                    कोकणात जायचे खूप  मनात होतेच पण तो दिवस आज आला.
काही अंतरावर गेल्यावर एक चहाची टपरी दिसली म्हंटल चहा घ्यावा थोडा आणि आम्ही सगळे उतरलो गाडीतून तसाही खूप काही प्रवास झाला न्हवता पण एन्जॉय म्हणून आपले उतरलो खाली तेवढ्यात काही जणांना त्या टपरी वरील तो चहाचा फलक दिसला तंदुरी चहा अरे वाह्ह तंदुरी चहा  काही  नवीनच होता आमच्या साठी कारण ह्या आधी आम्ही तंदुरी चहा प्यायलो न्हवतो तेव्हड्यात एकाने त्याच चहाची ऑर्डर पण दिली आम्हाला खूप आतुरता होती त्या चहाची कॉफी शॉप मध्ये हे असले कधी पाहिले न्हवते आम्ही चहाचा तो मातीच्या भांड्याचा कप हातात घेऊन लगोलग फ्हुर्र्र्र कन घोट घेऊ लागलो तो चहा च काही खास वाटत होता
मित्र  म्हणाले यार बरं झाल गाडी तुन खाली उतरलो असा तंदुरी चहा मिस झाला असता तर सगळे जण मोठा आवाज करून म्हणालो हो हो हो यार खूपच मस्त होता चला  अजून पिऊयात
तेव्हड्यात एकजण म्हणाला ? आम्ही म्हणालो जा तिथेच जाऊन रहा म्हणजे रोज प्यायला मिळेल तंदुरी चहा आणि हाहाहाहाहा हसत  करत पुढील प्रवास सुरु ठेवला...
थोड्या वेळाने सगळे झोपी गेले कारण आम्ही सायंकाळी प्रवास सुरु केला होता आणि आत्ता रात्रीचे काही ४:३० च्या आसपास झाले होते सगळे गाढ होते मग म्हंटल  आपण हि होऊयात
तास भर झोप झाली तेवढ्यात सचिन म्हणजे ड्राइवर तसा तो आमच्याच ग्रुप मधला पण ड्राइवर बोललो कारण तो गाडी चालवत होता
म्हणाला उठा उठा गाडी पार कोकणात अली आहे
तेव्हड्यात दचकून आम्ही सगळे उठलो पाहतो तर काय तो नजारा


आह आह काय तो रोड इतकी घनदाट झाडी आणि सकाळ ची ती वेळ  आत्ताच मन नुस्त  भरून गेल होत मग लगेच सगळे गलबलून जागे झालो आणि आस पास नजर टाकू लागलो तेवढ्यात नुसतेच सूर्याचे आगमन झालेले आम्हाला दिसले काय ते नयन-रम्य वातावरण त्या जणू समुद्रातुनच ज्वाला बाहेर यावा तसा तो वर येत होता.
मग जरा गाडी पुढे गेल्यावर थोडे खाली उतरलो जरा वेळ त्या वातावरणात बागडलो आणि पुढे कोकणात गेलो



 तो पर्यंत हि उजाडले होते पूर्ण आणि गावात शिरताच एक असे मस्त नजरेस पडलेले ते म्हणजे हा झोपाळा मस्त असं वाटत होत जाऊन बसावं काय सांगू इतकं मनं लहान झाल होत तो कोकण बघून यार

मग असाच प्रवास चालूच होता आणि अशीच धम्माल करत करत एकदाची त्या रिसॉट वर पोहचलो आणि थोडे फ्रेश वगैरे झालो आणि परत कोकण स्वारी चालू केली 


आणि त्यात मेघ राजांनी पण आपली उपस्थिती लावली मग अजूनच मस्त वातावरण झाल पण ते वातावरण काही वेळातच बंद पण झाले. आणि आम्ही पण खूप चाललो होतो म्हंटल आधी पोटपुजा करूयात आणि पुढील प्रवास करूया कारण पोट भरले तरच फिरता येईल


जेवण पण खूप मस्त च होत मस्त पैकी जेवण झाल आणि पुढील वाटचाल नुस्त फिरणं कारण एन्जॉय म्हणजे एन्जॉय लगेच गाडीत बसलो तेव्हड्यात समीर म्हणाला चला तीकडे एक मस्त बीच आहे बघूया मग काय लगेच गाडी काडली आणि त्या वाटेने जाऊ लागलो.


तो बीच लांबूनच छान वाटत होता पण एक अडचण होती कि तो बीच आहे तर जवळच पण नदीच्या वाटेने ?आणि असं जायचं म्हंटल तर जवळ-जवळ ३० किमी लांबून तिथे जावावं लागत होत मग आम्ही गाडी थांबऊन विचारपूस केली तर एक जण म्हणाले कि तुम्ही नदीच्या वाटेने जावा कारण तिथून खूप जवळ आहे जवळ ५ किमी असेल पण त्यासाठी बोठेन जावं लागत आणि तेव्हड्यात समीर म्हणाला आणि आमची गाडी इथे कोठे पार्क करून जाऊ ते म्हणाले छे छे गाडी घेऊनच जावा त्या बोठेत तुमची गाडीही बसू शकते मग तर आमची आतुरता खुपच वाढली अरे वाह्ह



जस जशी ती बोट जवळ येत होती तस आमचा आनंद  हि वाढत होता एकदाची आमची गाडी आत
 घातली व तो प्रवास चालू केला मस्त तो तो क्षण होता माझ्या आयुष्यातला आणि आम्ही त्या बाजूला हि पोचले जेमतेम दीड तासातच गेलो असेल आणि आम्ही तिकडून  गेलो असतो तर अजून मधेच कोठे तरी असतो.




आणि त्या बाजूने गाडी बाहेर काढली व त्या दिशेने जाऊ लागलो आणि बीच वरती खूप धम्माल केली पुढे अशी काही घरे दिसली



हि असली मस्त घरे पाहून मनं प्रसन्न झालं आणि हे फक्त कोकणातच पाहायला मिळत खूप खूप फिरलो आणि परतीचा  मार्ग पकडला जीवनात येऊन कोकण पाहणे म्हणजे काय सांगू शब्द नाही राव... जाताना एक मंदिर दिसले तिथे नमस्कार करून निघालो



आणि परत भेटू म्हणत कोकण स्वारी थांबवली जाताना जाऊ वाटत न्हवत कोकणातून पण काय करायचं ऑफिस घर हे तर आहेच ना रोजच रुटिंग पण अश्या गोष्टी असाव्या आयुष्यात माझी भटकंती .....





No comments:

Post a Comment