Friday, February 1, 2019

भावना


दगडाखाली अडकलेल्या माणसाला हे माहित नसतं की खाली फटीत साप आहे. वर येऊ पाहणाऱ्या त्या स्त्रिला माहित नसतं माणुस भल्यामोठ्या दगडाखाली अडकून वेदनांनी विव्हळतोय.

स्त्रि मनोमन विचार करते, "मी दरीत पडणार आहे, सापामुळे मला वर चढता येत नाही. अशा बिकट परिस्थितीत हा माणूस थोडा जोर लावून मला वर का काढू शकत नाही.

पुरुष मनोमन विचार करतो, "पाठीवरच्या दगडामुळे मला असह्य वेदना होत असतानाही मी या स्त्रिला वर काढायचा प्रयत्न करतोय. तर ती वर येण्यासाठी स्वत:हून अजुन थोडे प्रयत्न का करत नाही."

आपल्याला दुसऱ्यावरचा तणाव, त्याची परिस्थिती कधीच स्पष्ट दिसत नाही. त्याचवेळी दुसऱ्यालाही आपल्या वेदना, हतबलता लक्षात येत नाही. प्रत्येक जण आपापल्या परिने परिस्थितीशी संघर्ष करत असतो.
प्रत्येकाची काहीतरी मजबुरी, काहीतरी मर्यादा असते. म्हणून जेव्हा जेव्हा परिस्थिती अशा प्रकारच्या कोड्यात टाकते तेव्हा एकमेकांना समजून घेणे गरजेचं असतं. समजून न घेता पुर्वग्रहातुन एखाद्याविषयी करुन घेतलेले गैरसमज हानिकारक असतात. समोरच्याला काय वाटेल म्हणून आपल्या अपेक्षा मनात दाबून ठेवण्यापेक्षा मोकळेपणाने स्पष्ट संवाद साधने योग्य ठरते.

No comments:

Post a Comment